दुर्गापूर येथील 50 महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
चंद्रपुर :-चंद्रपूर तालुका राष्ट्रवादी महीलाच्या वतीने तालुका कार्यकारणी आढावा बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रम महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर कातकर यांच्या प्रमुखउपस्थितीत तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर यांच्या नेतत्वात दुर्गापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीत दुर्गापूरमधील महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके व तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून 50 महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन हाताला घड्याळ बांधली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके म्हणाल्या येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिति निवळणुक होणार आहे. त्याकरिता गाव तिथं राष्ट्रवादी हि संकप्लना राबवित आदरणीय . पवार साहेबांचे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी महीला संघटना मजबुत करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले . त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले . तसेच ज्येष्ठ नेते सुधाकर काटकर यांनी महिलांनी एकत्र येवून संघटन मजबूत करावे .असे मार्गदर्शन केले .तालुका अध्यक्ष अनीता मावलिकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी प्रामुख्याने उपस्थित जिल्हासरचिटणस पुजा सेरकी जिल्हा संघटक सरस्वती गावंडे तालुका कार्यकारणीतील शेकडो महीला पदाधिकारी उपस्थित होत्या .
About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।






0 Comments