अंबरदादा जीवतोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
वरोरा, ता. ___ (प्रतिनिधी)
सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असलेले अंबरदादा जीवतोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ते ३वाजताच्या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्व.शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे कृषीतंत्र विद्यालय, नंदोरी येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, युवक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी अंबरदादा जीवतोडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मार्गदर्शनपर मनोगत, सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी
आनंदराव जीवतोडे ,वसंतराव जीवतोडे, पांडुरंग लांबट, किशोर उमरे ,नरेंद्र जीवतोडे, मंगेश भोयर, विनोद लांबट, वाल्मीकराव घागी ,गुरुदेव हरणे अशितोष हरणे ,दादाजी झाडे, सौ आश्लेषा जीवतोडे (भोयर), चंद्रशेन देरकर , प्रफुल वाभीटकर, दयानंद जांभुळे, गजानन वीरुटकर, राजू ठेंगणे, संदीप लांबट ,रवी खाडे ,मोहन ठेंगणे ,उषाताई लांबट, निळकंठ अवगान, धनराज वरुटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .तसेच क्रीडा मंडळ_ नंदोरी, आष्टी ,(काकडे ),डोंगरगाव ,पीरली, पावना येथील युवा व महिला मंडळ बचतगट भजन मंडळ यामध्ये किन्हाळा ,सोनेगाव, नंदोरी ,पावना ,धानोली, पानवडाळा ,पीरली ,बेलगाव, मासळ ,मांगली ,धामणी ,आगरा, सागरा येथील बरीच महिलाची उपस्थिती होती तसेच मार्गदर्शन प्राचार्य महातळे मुख्याध्यापक नंदोरी व जेष्ठ मान्यवरांनी अभिष्टचिंतन पर आपले विचार प्रगट केले या कार्यक्रमाचे संचालन गुरुदेव हरणे, दादा झाडे यांनी केले तर आभार किशोर उमरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या अभिष्टचिंतन सोहळ्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

0 Comments