शिवविवाहात महामानवाच्या विचाराचा जागर

 शिवविवाहात महामानवाच्या विचाराचा जागर

 वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह




वरोरा (प्रतिनिधी )- लोप पावलेल्या प्राचीन वैभवशाली मातृसत्ताक निसर्गपूजक सिंधु बळी शिवसंस्कृतीचा सालेकर परिवाराने  मुलाच्या शिवविवाहातून समाजाला आपल्या खऱ्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून दिली.

.   रामचंद्र सालेकर यांचा मुलगा वैष्णव याचा शिवविवाह यवतमाळ येथील प्रकाश कोल्हे यांच्या कन्येशी पारंपरिक विवाह पद्धतीला फाटा देत नुकताच पार पडला.हा अनुभव बऱ्याच उपस्थित पाहुण्यांसाठी अनोखा होता. त्यांच्या शंकाचे निरसरण करतांना शिवविवाहात होमहवन कर्मकांड का नको? वधु उजव्या बाजूला का? वधु वराच्या मध्ये अंतरपाट का नको? अक्षदाऐवजी फुलांचा वर्षाव का? पारंपरिक मंगलाष्टाका ऐवजी शिवसप्तक का? इत्यादी सर्व शंकाचे निरसरण मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक प्रविण भोयर व खुद्द वराचे वडील रामचंद्र सालेकर यांनी करताच सर्व उपस्थितांनमधून फारच सुंदर प्रतिक्रिया येत असल्याचे जानवले. शिवविवाह विधीत जिजाऊ वंदना व शिवसप्तके गायन शिवसेवक गानोडे सर यांनी पार पाडले.

.  दुसरे दिवसी वर पक्षाकडून वरोरा स्थीत द्वारकाधीश लॉन येथे सालेकर परिवाराकडून शिवस्वागत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण संत महापुरुशांचे बॅनर्स व त्यांच्या सुवचनाने सर्व परिसर सर्वांना आकर्षित करीत होता.

स्वागत समारंभात वधु वरांच्या हस्ते अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा सोनूताई येवले यांचा सत्कार करून वृद्धाश्रमाला दहा हजाराचे वधु वराच्या हस्ते शिवदान देण्यात आले.

. सर्व उपस्थितांकडून या शिवविवाह व शिवस्वागत समारंभाचे कौतुक करून आदर्श घेण्यासारखा समारंभ असल्याची पंचक्रोशीत चर्चा दिसून येत आहे.

---

Post a Comment

0 Comments