...ठाणेदार साहेब 'त्या 'अण्णाला आवरा
अण्णाच्या टोळ्या चौका -चौकात
अवैध सट्टापट्टीचा धंदा तेजीत
वरोरा (प्रती) वरोरा शहरात गेल्या अनेक दिवसापासून सट्टापट्टीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे , त्यातच नव्याने 'अण्णा' हे नाव शहरात चर्चेचा विषय बनला आहे ,अवैधपणे सट्टापट्टीचा व्यवसाय करणारा वणी तालुक्यातील राजूर येथील अण्णांने शहरात दमदार एन्ट्री केली असून एजंट मार्फत अण्णा खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय चालवितो, चौका -चौकात अण्णाने एजंटचे जाळे पसरविले असून
बोर्डा चौक ,साई मंगल कार्यालय परिसर तसेच सब्जी मंडी , बाकी इतर ही जागी अन्नाने एजंट नेमले आहे .सदर एजंट मार्फत अण्णा उघडपणे आपला व्यवसाय चालवित असल्याचे दिसत आहे. साई मंगल कार्यालयाच्या अगदी बाजूला चक्क एका टीनाच्या शेडमध्ये बसून खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय करतांना एजंट दिसतात
सदर रस्ता हा रहदारीचा असून यामुळें नागरिकाचे, विद्यार्थ्यांचे लक्ष त्याकडे वेधल्या जाते
परंतु याकडे पोलिसाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे,
एका रुपयाला १० रुपये,१० रुपयाला १०० रुपये, तर १०० रुपयाला १००० रुपये असा चढा भावाचा व्यवसाय चालवीत असून ग्राहक या भावाला बळी पडत आहेत.
नव्यानेच रूजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नयोनी साटम यांनी काही दिवसांपूर्वी माढेळी येथील सट्टापट्टी व्यवसायावर धाड टाकली असता सट्टापट्टी घेणारे व लावणारे एकूण२८ आरोपींना अटक केली होती ही सर्वात मोठी कारवाई समजल्या जात आहे परंतु आजपर्यंत ठाण्याअंतर्गत कुठलीच मोठी कारवाई केली नसल्याचे बोलले जाते या सट्टापट्टीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असल्याचे दिसत असून यावर ठाणेदार साहेब यांनी आळा घालावा अशी जनतेची मागणी होत असतांना दिसत आहे चौका- चौकात सुरू असलेला सट्टापट्टीचा व्यवसाय बंद करून अन्नाच्या टोळक्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

0 Comments