चाळीस दिवसीय उन्हाळी स्पोकन इंग्रजी शिबिराचा समारोप



चाळीस दिवसीय उन्हाळी स्पोकन इंग्रजी शिबिराचा समारोप 

 शिबिरार्थींच्या चेह-यावरील आत्मविश्वास ही शिबिराच्या यशाची पावती 



            
वरोरा (प्रती )   दि. १४ मे २०२४ ते २४ जून २०२४ या कालावधीत जि. प. उ. प्राथ. शाळा साखरा राजा , पं. स. वरोरा येथे संपन्न झालेल्या स्पोकन इंग्रजी उन्हाळी शिबिराचा समारोप आज दि. २४ जून २०२४ ला संपन्न झाला . गो विथ स्ट्रकचर द्वारे आयोजित या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ. सिमा राऊत शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. वरोरा तर उदघाटक म्हणून नामदेव राऊत शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. वरोरा  हे होते .

             आपल्या संबोधनात राऊत सर म्हणाले की गो विथ स्ट्रकचर गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामिण भागातील मुलांच्या स्पोकन इंग्रजीवर सातत्याने कार्यरत आहे . मुलांच्या चेह-यावर झळकणारा आत्मविश्वास आणि मुलांची इंग्रजी वाक्यरचनांवरील पकड अविश्वसनीय आहे . हा उपक्रम ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव संधी आहे . अध्यक्षिय स्थानावरुन बोलतांना सीमा राऊत म्हणाल्या की पुढे जाऊन उच्च शिक्षणात उंच भरारी घ्यायची असेल तर इंग्रजी कडे आत्तापासूनच लक्ष देणे ही काळाची गरज आहे . इंग्रजी चांगल असेल तर यशस्वी होण्यासाठी असंख्य मार्ग आपोआप खुलतात . ग्रामिण भागातील मुलांनी अगदी प्राथमिक शाळांमध्येच इंग्रजी मजबूत करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे . नेहरु विद्यालयाचे प्राचार्य बालाजी ढाकूनकर यांनी गो विथ् स्ट्रकचर च्या लर्निंग टू लर्न या संकल्पने चा पुरस्कार करत विद्यार्थ्यांनी आता केवळ शाळांच्या भरवशावर अवलंबून न रहाता स्वयं अध्ययनावर भर देण्याचा आग्रह केला . या शिबिरातील विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्वल असल्याचेही ते म्हणाले .

             यावेळी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले ज्यात डाॕ गंपावार , सागर पाटील , संजय जांभुळे सर , धनराज रेवतकर सर यांचा समावेश आहे . यावेळी साखरा सरपंच शामकलाताई पाटील , दिपक पिरके , प्रकाश जोशी , सचिन जोशी , भारती बतकी , डीमलेश पातुरकर , रमेश बावणे , रमेश चौधरी , गणेश राऊत सर , भास्कर कुडे , सुनिल कार्लेकर , पूरुषोत्तम सातकर , दिगांबर खुडसंगे , ज्ञानदेव गाठे , मनोज उमरे , पालक वर्ग व शिबिरार्थी उपस्थित होते . यावेळी पं. स. वरोरा च्या वतीने या शिबिराचे संचालक गोपाळ गुडधे सरांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . याचवेळी ३१ मे २०२४ ला सेविनिवृत्त झालेले हरीभाऊ दारुंडे केंद्रप्रमुख यांचा सेवानिवृत्तीपर सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .

           समारोप समारंभाचे सूत्रसंचलन अंजली आवारी , तनिषा शेंडे , कु. चौधरी , ओम दमाहे व रोहित उमरे यांनी इंग्रजीतून केले . कु सानिका बन्सोड व काव्या गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments