युवा नेते करण देवतळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
(वरोरा) युवा नेते करण देवतळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन दि.८ जुलै रोजी वेळ स.१० ते सायं ४ वा स्थळ- कटारिया मंगल कार्यालय जुना वणी नाका वरोरा येथे करण्यात आले आहे.
सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात यश संपादन करणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय संजय बाबू देवतळे माजी मंत्री, (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून करण संजय देवतळे युवा नेता यांना त्यांचा वारसा लाभला व त्यांनीही विविध क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिलेले आहे त्यांचे अभिष्टचिंतन व्हावे ही देवतळे मित्र परिवाराची इच्छा आहे व त्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केले आहे त्यांचे कौतुक व्हावे व उज्वल भविष्याकरिता त्यांना शुभकामना देण्यास त्यांचा सत्कार आयोजित केला असून याच कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

0 Comments