गजानन मुंडकरांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती वरोराचा अभिनव संकल्प
मिशन नवो-स्काॅलर
वरोरा (प्रती) दि. २८ /०८/२०२४ रोज बुधवारला पं. स. वरोरा येथे गजानन मुंडकर गटविकास अधिकारी पं. स. वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानेश्वर चहारे गटशिक्षणाधिकारी पं. स. वरोरा तथा श्वेता लांडे शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. वरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी ला शिकविणा-या शिक्षकांची २०२४-२५ या सत्रात होणा-या नवोदय व स्काॅलरशीप परिक्षेसंदर्भात एक महत्वाची सभा पार पडली .
या सभेत दुस-या सत्रात उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना मुंडकर म्हणाले की जि. प. शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर नियोजन बद्ध काम केल्यास निश्चितपणे या स्पर्धा परिक्षा मध्ये घवघवीत यश मिळविता येते . यासाठी शिक्षण विभाग व मनापासून काम करणा-या शिक्षकांनी एकत्र येऊन नियोजन करावे व हा उपक्रम यशस्वीपणे राबविता येण्यासाठी जे कोणतेही सहकार्य लागेल ते करण्यासाठी मी तत्पर असेन असे ते म्हणाले .
सभेच्या पहिल्या सत्रात श्वेता लांडे मॅम यांनी मुंडकर सरांची या परिक्षेसंदर्भात व एकूणच नियोजना बाबत ची संकल्पना समजावून सांगितली व लगेच सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी नवोदय व स्काॅलरशीप या परिक्षेच्या सरावासाठी चे घटकवार नियोजन केले . प्रत्येक विषयासाठी सहा तज्ञ शिक्षकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली . हे शिक्षक या प्रत्येक महिन्यांमध्ये विभागून दिलेल्या घटकांवर आधारीत घटक चाचण्या तयार करतील व प्रत्येक महिन्याच्या २५ ते ३० तारखे दरम्यान घटक चाचणी घेण्यात येईल . डिसेंबर पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून लगेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत सराव पेपर्स सोडवून घेण्यात येतील . या अभिनव उपक्रमाला " मिशन नवो-स्काॅलर " हे नाव देण्यात आलेले आहे . अतिशय नियोजनबद्ध सुरवात झाल्यामुळे शिक्षकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे .

0 Comments