माजरी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न
वरोरा( प्रती)
चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन माजरी येथे दिनांक १८ आॅगष्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.
या शिबीराला माजरी ,नागलोन,विस्लोन,कुचना,मनगाव,पळसगाव,पाटाळा,कोंढा,चालबर्डी,राळेगाव,थोराना,देऊरवाडा,माजरी काॅलरी,कढोली,शेंबळ या गावातील बहुसंख्य नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
या कार्यक्रमाचे उदघाटन मा.छायाताई जंगम,सरपंच माजरी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय खंगार,विरेंद्र वानखेडे,महेश मोरे,स्वप्निल वासेकर,प्रदिप हेकाड,रवि इंगोले,जलालउद्दीन शेख,पप्पु खान,अब्दुल सत्तार,संध्याताई पोडे,ज्योतीताई लांडगे, हे मान्यवर उपस्थित होते,रवि राॅय,हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक राजा खान संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन विजय यादव यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय चंद्रपूरची सर्व टिम व आवेश सिध्दीकी,दिलदार अली,राकेश यादव,पंकज ककोडीया,अंगद यादव,कासिम सिध्दीकी,तस्लिम सिध्दीकी,प्रकाश सहानी,आकाश राम,स्वप्निल कश्यप,क्रिष्णा कुमार,मुकेश गुप्ता,निशांत चव्हाण,रवि निषाद,अनिस खान,ऐहसान अहमद,रामफल केवट,कमलेश केवट,विवेक सुर्यवंशी,असरफ खान ग्राम पंचायत माजरी व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले.

0 Comments