मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा 2  या स्पर्धेत  तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,शेगाव (बु.) शाळेने पटकाविला प्रथम क्रमांक 

       वरोरा (प्रती )    सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील " मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा 2 "  या स्पर्धेत पं. स. वरोरा अंतर्गत   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,शेगाव (बु.)  ही वर्ग १ ते ४ ची शाळा  प्रथम आलेली आहे. पंचायत समिती वरोरा अंतर्गत एकून १५३ शाळा आहेत. या स्पर्धेत सर्वच शाळांनी सहभाग घेतलेला होता. केंद्रस्तर व तालुकास्तरीय मुल्यांकन परीक्षणात या शाळेस उपलब्ध असलेल्या निर्धारीत घटकांवर  सर्वाधिक गुण प्राप्त झाले. मुल्यांकन करणाऱ्या परीक्षकांकडून भौतिक सुविधेसह इतर घटकांचे परिक्षण करुन शाळेचा गुणांनुक्रम प्रथम देण्यात आला. ही स्पर्धा एकूण १५० गुणाची होती.
या उपक्रमशील शाळेत १६८ पटसंख्या असून अध्ययन अध्यापनासह शासन स्तरावरून राबविण्यात येणारे विविध  उपक्रम राबविले जातात. या शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शाळेचे सतत कार्य सुरु असते. शाळेत एक उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सहा सहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत .
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा २ या स्पर्धेत गजानन मुंडकर  संवर्ग विकास अधिकारी पं स वरोरा , ज्ञानेश्र्वर चहारे गटशिक्षणाधिकारी पं. स.वरोरा तसेच सागर पाटील विस्तार अधिकारी बीट - शेगाव ( बु.) या सर्वांचे सहकार्य तथा मार्गदर्शन लाभले. मुल्यांकनादरम्यान केंद्रस्तरीय तथा तालुकास्तरीय टीम ने केलेल्या सूचनांचा फार उपयोग झाला .
                       शाळेला स्पर्धेत प्रथम येण्यासाठी  ग्रामपंचायत शेगाव ( बु.) येथील सर्व पदाधिकारी तथा कर्मचारी व शालेय स्तरावरील सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचे व पालक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
अनंत वसंत आखाडे उ. श्रे. मुख्याध्यापक,रवींद्र हरी साखरकर,  अजय अशोक भगत, गोपाल जांभूळकर,  सविता श्रावण बगडे, स्मिता नगरारे, ज्योत्स्ना नारायण पाटील, या सर्व कार्यरत शिक्षकांनी स्पर्धात्मक  गुणांकन साठी विशेष  सहकार्य केले.