नॅशनल गणेश मंडळाच्या राजाचे २३ व्या वर्षात धुमधडाक्यात आगमन

सामाजिक उपक्रमाची रेलचेल


वरोरा (प्रती)गणेश उत्सवाच्या सार्वजनिक साजरीकरणाची सुरुवात १८९३ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. या निर्णयामागे एक सामाजिक आणि राजकीय उद्देश होता. ब्रिटिश राजवटीच्या काळात  भारतात जमावबंदीचे नियम कडक केले गेले होते, ज्यामुळे भारतीयांना एकत्र येणे कठीण झाले. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेला एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचे प्रतीक बनवून त्याचा उपयोग स्वातंत्र्य संग्रामासाठी केला. गणेशाची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी स्थापन करून त्यावर समाजातील विविध गटांना एकत्र आणणे, हा त्यांचा उद्देश होता  स्वातंत्र्यानंतर काळ बदलत गेला गणेश उत्सवाला आता धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व निर्माण झाले विशेषत: महाराष्ट्रात गणेश महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वरोरा शहरातील नॅशनल गणेश मंडळ वरोरा या मंडळाचे नाव अग्र क्रमांकावर असल्याचे बोलले जाते. गेल्या २२ वर्षापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश महोत्सव साजरा करण्यात येतो या गणेश महोत्सवाला (स्थापनेला) बावीस वर्षे पूर्ण झाले असून २३ व्या वर्षात धुमधडाक्यात गणेशाचे दमदारआगमन झाले आहे. नॅशनल गणेश मंडळाच्या वतीने दिनांक ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष बाब म्हणजे गेल्या 22 वर्षापासून नितीन शर्मा हे अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. हे विशेष, दहा दिवस चालणारा हा गणेश महोत्सव नव चैतन्य निर्माण करणारा ऊर्जा देणारा असतो यामध्ये सामाजिक उपक्रमाची रेलचेल पहावयास मिळते.
प्रथमच सन २००२ मध्ये नॅशनल गणेश मंडळाने वीस, वीस रूपये वर्गणी गोळा करून  गणपतीची प्रतिष्ठापना  केली होती .हे विशेष बाब म्हणावी लागेल दहा दिवस चालणाऱ्या या गणेश महोत्सवा मध्ये सामाजिक उपक्रमाची रेलचेल दिसून येते सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना कृषी पंप ,  दिव्यांग  व्यक्तींना व्हीलचेअर गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्लॅंकेट वाटप, गरीब विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप , तसेच दरवर्षी वृद्धा आश्रमामध्ये अन्नदान  मंडळाच्या वतीने  करण्यात येते. नॅशनल गणेश मंडळाची समाजाप्रती असलेली आस्था  सामाजिक बांधिलकी जपत मंडळाचे अविरतपणे काम सुरू आहे, नवचैतन्य निर्माण करणारा हा उत्सव असून नॅशनल गणेश मंडळाने शहरात नव्हे तर वरोरा तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नॅशनल गणेश मंडळाचे अध्यक्ष, नितीन शर्मा ,उपाध्यक्ष, सुशील नरडे, सचिव, पवन निर्बाण, सहसचिव, शुभम चांभारे, कोषाध्यक्ष, मधुर कातोरे, सदस्य, गौरव बोरा, अनिकेत उंबरे, रवी पटेल व अन्य ७२ सदस्य आजही अविरतपणे काम करीत आहेत