रोटरी तर्फे तान्हा पोळा उत्साहात साजरा





वरोरा (प्रती)


रोटरी क्लब वरोरा व जय भारतीय गणेश मंडळ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जय भारतीय चौकात रोटरी क्लब वरोरा चे अध्यक्ष बंडूभाऊ देऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली  तान्हा पोळा  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 कार्यक्रमात रोटरी चे  सचिव अभिजीत मणियार  पदाधिकारी डॉ सागर वझे ,डॉ विवेक तेला, दामोदर भासपाले,  अमित नाहर, राम लोया, मनोज जोगी, योगेश डोंगरवार, पवन भुजाडे, हिरालाल बघेले,मनोज कोहळे ,होजफा अली, अली हुसेन सिद्दिकोट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
    अध्यक्षीय भाषणात  बंडू देऊळकर म्हणाले की तान्हा पोळा हा विदर्भाची खास ओळख आहे. लहान मुलांना बैलाचे व शेतीचे महत्व समजावे म्हणून नागपूरचे श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती आणि हीच परंपरा वर्षांपासून कायम आहे. जय भारतीय चौकात मागील पन्नास वर्षापासून तान्हा पोळा उत्साहात   साजरा  करण्यात येत आहे. रोटरी मागील पंचवीस वर्षापासून यात सहभागी आहे . या वेळी इतर मान्यवरांनी ही तान्हा पोळ्याचे महत्व विषद केले .