प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन "त्या" विवाहित दुकानदाराला बेदम मारहाण
वरोरा( प्रति) वरोरा शहरातील गांधी चौकातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला त्याच्याच दुकानात जाऊन एका विवाहित युवकाने मारहाण केल्याची खळबळ जनक घटना मागील चार-पाच दिवसांपूर्वी घडली असून या घटनेची चर्चा संपूर्ण वरोरा शहरात होत आहे. सदर युवक हा एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर सतत चॅटिंग करत होता ही बाब पतीच्या लक्षात येताच त्या दुकानदाराला काही दिवसापूर्वी समस् देण्यात आला होता परंतु सतत चॅटिंग केल्यामुळे सदर पतीने टोकाची भूमिका घेत त्या दुकानदाराला बेदम मारहाण केली अशी चर्चा शहरात होत असताना दिसत आहे.
सदर घटना ही सोमवारला रात्री ८: ३०ते ९: ००वाजताच्या दरम्यान गांधी चौकातील एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दुकानात घडली यामुळे वरोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे परंतु मारहाणीची तक्रार पोलिसात दिली नसल्याची माहिती हाती आली आहे. याआधी काही दिवसापूर्वी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विवाहित दुकानदाराच्या वडिलांना सुद्धा एका महिलेच्या प्रकरणावरून जाम चोप दिला होता. वडिलांच्या पाठोपाठ मुलाने एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर चॅटिंग केल्याने मारहाण केल्याची घटना घडली असून शहरात चर्चेला उधाण आले आहे

0 Comments