अहेतेशामभाऊ यांचा हस्ते ग्रामीण युवा क्रीड़ा मंडळ, अर्जुनी येथील कबड्डी सामन्याचे उद्घाटन



      वरोरा(प्रती ) अर्जुनी (तु ) गाव येथे ग्रामीण युवा क्रीड़ा मंडळ, व समस्त ग्रामवासी तर्फे आयोजित दोन दिवसीय भव्य कबड्डी सामण्याचे उदघाटन अहेतेशामभाऊ अली यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व गांववासीयांशी संवाद साधला. या वेळी गावातील सरपंच-सोनुबाई हनवते, उपसरपंच-प्रफुलभाऊ भेंडारे, संदीप विद्याते, सुनील बोढ़े-अध्यक्ष -त. मू. स. अर्जुनी, दत्तात्रय कुंभारे -माजी सदस्य प. स. वरोरा. नंदलाल झींगरे, माजी संचालक आदिवासी सो.- दशरथ देहारकार, 
वनरक्षक- शेख साहेब,गुणवंत देहारकर, विलास कष्टी,सोबत सर्व अर्जुनी ग्रामवासी या प्रसंगी उपस्थित होते.