लोकमान्य विद्यालयात दहीहंडीचा जल्लोष
गोविंदा पथकांच्या थराराने रंगली मैफल
वरोरा (प्रति)लोकमान्य विद्यालय, वरोरा येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोरा यांच्या वतीने दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग, बालगोपालांची श्रीकृष्ण वेशभूषा आणि उपस्थितांचा उत्साह यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय व आनंदमय वातावरणाने भारून गेला.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ वरोराचे योगेश डोंगरवार, अभिजित भाऊ बोथले, अदनान सिद्धीकोट, सुनील अयाचित तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराचे अध्यक्ष Rtr. विक्की आगलावे, नितीन भोजेकर, सुमित पारखी, हिमांशू केशवानी, आदित्य ठाकरे यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
इनरव्हील क्लबच्या वतीने संध्या बारयजी, टोंगे मॅडम व इतर सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. लोकमान्य विद्यालयाचे राखे सर, खुळे सर, पराते मॅडम, मोरे सर यांच्यासह शिक्षकवृंदाचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
*गोविंदा पथकांच्या थराराने वाढली कार्यक्रमाची रंगत*
दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आपल्या सांघिक कौशल्याचे दर्शन घडवले. हंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेले मानवी मनोरे आणि गोविंदांचा जल्लोष पाहण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली. उत्साह, एकजूट आणि टीमवर्कच्या जोरावर दहीहंडी सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक ₹५,००० अनिल ठाकरे, अर्जनविस यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक ₹३,००० सुनील अयाचित यांच्या वतीने, तर तृतीय पारितोषिक ₹२,००० अर्फिता झेरॉक्स यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.



0 Comments