गडचांदूर:-
सर्वधर्म समभावचे प्रतीक,अनेकांचे श्रद्धास्थान हज़रत ख्वॉजा मोईन्नोद्दीन चिश्ती यांचा वार्षिक उर्स अख्ख्या जगात मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरा केला जातो.या पावन पर्वाचे निमित्य साधुन कोरपना तालुका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीन 'एआयएमआयएम' तर्फे 8 फेब्रुवारी रोजी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना फळ व बिस्कीटे वाटप करण्यात आली.यावेळी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय घाटे,डॉ.प्रशांत गेडाम,डॉ. नामपल्ले,एआयएमआयएम चे तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्यासह अब्दुल हफिज,मुनाफ शेख,मो.रऊफ,मो.सोहेल,दस्तगीर,रज्जा़क शेख,शेख कादर,शब्बीर शाह,अब्दुल गनी,शेख अकबर,शेख फिरोज,शेख युसूफ,शेख रमजा़न, वसीम रिज़वी,नासीर खान इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वरोरा टाईम्स.com 📲☎️
☎️ 8308221919 ☎️

0 Comments