वरोरा :- महाराष्ट्र राज्याचे नगर विकास तथा बांधकाम उपक्रम मंत्री ,शिवसेना नेते तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना ज़िल्हाप्रमुख मुकेश जीवतोड़े यांच्या संकल्पनेतुन शिवसेना ज़िल्हा चंद्रपूर वतीने हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वृत्तपत्र वाचन केंद्र वरोरा येथे सुरु करन्यात आले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या जुन्या नगरपरिषद इमारतीमधील असलेल्या कार्यालयात सदर वाचन केंद्राचे उद्घाटन वरोरा येथील पत्रकारांच्या हस्ते आज बुधवार रोजी करण्यात आले.
सदर वाचन केंद्रात १३ विविध वृत्तपत्र वरोरा वासीयांना वाचनास मिळनार आहे. वरोरा येथील गांधी उद्यान मध्ये वाचनालयात पूर्वी ही व्यवस्था होती. परंतु वाचनालय बंद असल्याने गरजू व्यक्तींना वृत्तपत्र वाचण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागत होते.त्यांचा तो त्रास या वाचनालया मुळे आता कमी होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे,रमेश मेश्राम, संदीप मेश्राम, दिनेश यादव, विपीन काकडे,गजू पंधरें, मनीष दोहतारे आलेख रठे,भुषण बुरेले,अमित निब्रड, मीनल आत्राम, बंडू खैरे,गणेश चिडे, मनिष ठक,अतुल नांदे,गणेश जानवे, महेश जिवतोडे,पियुष जगताप, सुयोग दुर्योधन,सोहेल शेख, बाला चांभारे, निखिल पंडितवार यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरोरा टाइम्स. Com 📲
☎️ 8308221919 ☎️

0 Comments