*शेतक-यांनी आता निर्यातदार व्हावे - नरेंद्र जिवतोडे*
भद्रावती,दि.९ (तालुका प्रतिनिधी)
शेतक-यांनी आता निर्यातदार व्हावे असे आवाहन किसानपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी केले.
ते किसानपुत्र शेतकरी संघटनेतर्फे संघटनेच्या नंदोरी येथील समुह शेतीत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्याचा शेतमाल विदेशात निर्यात संदर्भात आयोजित प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक सचिन झीरपे,दुबई येथील निर्यातदार होते. त्यांनी शेतकऱ्याचा शेतमाल शेतक-याच्या बांधावरूनच नगदी स्वरूपात खरेदीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ अर्चनाताई नरेंद्र जिवतोडे, पं. स. सभापती प्रवीणभाऊ ठेंगणे, तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम, मंडळ कृषी अधिकारी झाडे साहेब, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ एकरे, आकाशभाऊ वानखेडे, निखिलभाऊ वानखेडे, विस्मयभाऊ बहादे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य प्रगतिशील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
0 Comments