गडचांदूर:
गडचांदूर प्रभाग क्रं.2 येथील रहिवासी पल्लवी शुभम पेंढारकर,ही 9 महिन्याची गरोदर महिला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घरावर कपडे वाळत घालत असताना घरावरून गेलेल्या 33 हजार हाय व्होल्टेजच्या विद्युत ताराचा करंट लागल्याने प्रचंड भाजली होती.या घटनेत तिने एक हात ही गमवलेला आहे.अशा अवस्थेत 1 महिन्यापूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.महिलेच्या घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,सूज्ज्ञ नागरिकांनी या महिलेच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती करण्यात आली होती.ही बाब लक्षात घेऊन गडचांदूर भाजपच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी या महिलेला रोख रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली आहे.यावेळी भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,संदीप शेरकी,महादेवराव एकरे,हरीहाऊ घोरे,गंगाधर खंडाळे,राकेश अरोरा इतरांची उपस्थिती होती.
फोटो:-


0 Comments