शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा* - डॉ. अंकुश आगलावे




    वरोराः- श्री. गणेश प्राणप्रतिष्ठा वर्धापन उत्सव एवं संगीतमय प्रवचनाच्या आयोजन निमित्त कंेंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष, डॉ. अंकुश आगलावे यांनी शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा असल्याचे मत या कार्यक्रमात व्यक्त केले.हा कार्यक्रम श्री गणेश मंदीर प्रांगण, कुचना कॅम्प त. भद्रावती येथे दि. 3 फेब्रुवारी संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरूवात देवीदेवताची सामुहीक औक्षवण, अभिषेक तथा आरती करून सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व्ही.के. गुप्ता साहेब, क्षेत्रीय महाप्रबंधक मा. क्षेत्र यांचे व्दारे करण्यात आले.
       या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून  डॉ. आगलावे यांची होती. या कार्यक्रमात डॉ. आगलावे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की शेतकÚयांना वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता अर्पन केली. शेतकरीचा हाच संपूर्ण विश्वाचा पोंशिंदा असल्याचे सांगितले. सदर्हू कार्यक्रम हे माजरी वसाहतीत होत आहे ती वस्ती शेतक-यांची जमीनीवर  असल्याचे सांगितले. 
         वेकोलि वसाहत शेतकरी यांच्या भुमीवर असून शेतक-यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, नोकरी किंवा शेतीच्या जमीनीचा मोबदला योग्य व  लवकरात लवकर दयावा  अशी व्ही.के. गुप्ता साहेबांसमोर विनंती करण्यात आली.
         यापुढे डॉ. आगलावे म्हणाले की, सत्संग कार्यक्रमाव्दारे सुसंस्कृत नागरीक घडविता येते. या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य ह.भ.प. सुश्री आशाजी दाणी बोरी अरब यांचे स्वागत व सत्कार डॉ. आगलावे यांनी केला तसेच व्ही. के. गुप्ता साहेब यांनी डॉ. आगलावे यांचे समाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
        सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन श्री. सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुदाम ठक, उपाध्यक्ष दिपक देरकर, सचिव देवानंदजी पोडे, सहसचिव अनंत सोमसेटवार, बापूरावजी दुबे कोषध्यक्ष यांनी केला. या कार्यक्रमात कुचना कॅम्प वसाहतीतील अनेक नागरीकांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments