चंद्रपूर:-राज्य सरकारने नुकताच सुपर मार्केट व कीराणा दुकानांमध्ये दारू/वाईन विक्रिला परवानगी दिली आहे.हा निर्णय योग्य नसून त्याचा सगळीकडे निषेध नोंदविला जातो आहे.वं राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी आयुष्यभर भजनाच्या व भाषनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी फार मोठे परीश्रम घेतले आणि राज्य सरकार व्यसनमुक्ती विषयी धोरण राबवत नसून पुनच्छा चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविली आहे आणि आत्ता चक्क सुपर मार्केट व कीराणा दुकानांमध्ये दारू/वाईन विक्रिला परवानगी देत आहे याचा निषेधार्थ श्री गुरूदेव सेवा मंडळ तुकुम, ऊर्जानगर व इंदिरानगरच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयास चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देऊन तात्काळ हा निर्णय रद्द करावा असे कळविण्यात आले आहे.जिल्ह्यातील या सामाजिक कार्यात इतरही गुरुदेव सेवा मंडळांनी सहभागी होऊन निवेदने देऊन यांचा निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.यावेळी श्रीगुरुदेव सेवा मंडळ तुकुमचे अध्यक्ष बबनराव अनमूलवार ,उपाध्यक्ष संतोष राऊत,सचिव रामराव धारणे,कोषाध्यक्ष देवराव बोबडे ,भाऊराव बावणे,दयाराम ननावरे ,गणेश रोडे तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचे सेवाधिकारी शंकर दरेकर,देवराव कोंडेकर,खेमदेव कन्नमवार, विठ्ठल ननावरे ,परशुराम धांडे व श्री गुरुदेव सेवा मंडळ इंदिरानगरचे अध्यक्ष प्रकाश पोहनकर, अरुण चांदेकर,भास्कर ईसनकर ,भास्कर भोकरे,आनंदराव मांदाळे,पुरुषोत्तम राऊत,केशव गराटे तसेच महिला सेविका मायाताई बोबडे,शारदा रोडे,मायाताई मांदाळे,शालिनी धारणे, सरस्वती धमाणे,इंदूताई वऱ्हाटे,सिंधुताई दडमल,संगीता जोगी,राऊतताई,मंजुळाताई हिवरकर,वीणाताई शेंडे,सुनंदा उइके तसेच चंद्रपुरातील गुरूदेव सेवा मंडळाचे सेवक सेविका यांची उपस्थिती होती

0 Comments