बोर्डा येथील शांती नगर फेस 3 मध्ये बुद्ध जयंती उत्साहात साजरी

बोर्डा येथील शांती नगर फेस 3 मध्ये  बुद्ध जयंती उत्साहात साजरी



वरोरा (प्रती) - वरोरा तालुक्यातील बोर्डा गावातील शांती नगर फेस 3 येथे दि.२३मे ला बुद्ध पौर्णिमाच्या निमित्याने  बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेच्या महान पर्वावर  भगवान गौतम बुद्ध यांच्या आदर्शांप्रती अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात  बुद्ध वंदनेने झाली. तथागत भगवान बुद्धांच्या तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या उपदेशांचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या शिकवणीचे सामाजिक जीवनातील स्थान स्पष्ट केले.

त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. लहान मुलांनी, जेष्टांनी भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. त्यांच्या गीत गायन सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नुकत्याच 12वी च्या लागलेल्या निकालात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला.

धम्म प्रवचनात, उपस्थित मान्यवरांनी भगवान बुद्ध यांच्या शिकवणीवर आधारित जीवनातील अनमोल धडे सांगितले. बुध्दानी सांगितलेल्या शिकवणींना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमात विविध समाजसेवी संस्थांनी सहभाग घेतला आणि त्यांनी समाजात शांती आणि सदभावना पसरवण्यासाठी भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार केला. 

शांती नगर फेस 3 येथील बुद्ध जयंती उत्सवाने संपूर्ण परिसरात शांतीचा, एकात्मतेचा आणि सदभावनेचा संदेश पसरवला बुद्धजयंती निमित्याने   सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प केला.

Post a Comment

0 Comments