महाबोधी बुद्ध विहार भूमी येथे बुध्द जयंतीचे आयोजन
वरोरा (प्रती) दि.२३/५/२०२४ रोज गुरुवारला स. ११.०० वाजता "महाबोधी बुद्ध विहार, भुमी" सद्गुरू नगर/साकार नगर/ पद्मालय नगर, वार्ड क्रं 3 (ग्राम पंचायत एकार्जूना) येथे अवघ्या विश्वाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे, "तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६८ वी जयंती तसेच वैशाख पौर्णिमा " निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात आयु. राहुलजी कळसकर, बबनराव बनसोड, विजय धोपटे, निर्गुण पेटकर, पंडीत बोरकर,अशोक देवगडे, गुरुदेव दुर्योधन साहेब, अमोल आवळे, डॉ.खडतकर साहेब, राहुल आवळे ,नलिनी ताई देवगडे, रजनी ताई आवळे, हिरा ताई रामटेके, दुर्योधन मॅडम, नंदिनी ताई खडतकर,आणि इतर सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्ध उपासक , उपासिकांच्या उपस्थितीत आयु. राहुलजी कळसकर यांचे अध्यक्षतेखाली तथागत भगवान गौतम बुद्ध तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजारोहण व मानवंदना करून अभिवादन करण्यात आले व उपस्थित बौद्ध बांधवांना तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म सर्वांनी आत्मविश्वासाने ग्रहण करण्याची प्रेरणा दिली व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचे मार्गदर्शन केले, त्या बद्दल " महाबोधी बुद्ध विहार,भुमी " सद्गुरू नगर,साकार नगर पद्मालय नगर ,व महीला मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले .

0 Comments