वरोरा येथे बुद्धभूमीवर बुध्द पहाट
बुद्ध जयंती उत्साहात साजरी
वरोरा (प्रती)
बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोराच्या वतीने दिनांक २३ मे २०२४ ला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची २५६८ वी जयंती मोठ्या उत्साहात बुद्धभूमी मैदानावर साजरी करण्यात आली.याप्रसंगी सकाळी ४.३० ते५.३० वाजता ध्यान साधना घेण्यात आली. आणि ध्यानसाधनेचे महत्त्व आणि वैशाख पौर्णिमेचे महत्व आयु. राहुल कळसकर यांनी उपस्थित उपासक आणि उपासिकांना समजून सांगितले. त्यानंतर सकाळी ५.३० ते८.३० वाजेपावेतो प्रसिद्ध गायक निवेदक आणि आकाशवाणी केंद्राचे उद्घोषक हेमंत शेंडे आणि सहकारी यांच्या °जागर समतेचा° ही बुद्ध भीम गीताची मालिका बुद्ध पहाट या कार्यक्रमात साजरी करण्यात आली यामध्ये हेमंत शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेल्या अनेक गीतांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .कार्यक्रमाच्या शेवटी "घबराए जब ,तन अनमोल" या गीताचे उत्तम सादरीकरण करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. यानंतर सर्व उपस्थिताना बहुउद्देशीय पंचशील मंडळाच्या वतीने अल्पोपहारआणि खीर वाटप कऱण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बहुउद्देशीय पंचशील मंडळाचे पूज्य भदंत धम्मसारथी महाथेरो, (अध्यक्ष )विजय धोपटे ,(उपाध्यक्ष) बंडू लभाने ,(सचिव) राहुल कळसकर ,(सहसचिव) बबनजी बनसोड ,(कोषाध्यक्ष) प्रीतम सोनारकर ,अशोक गजघाटे गुलाब बागेसर ,पुरुषोत्तम वैद्य, जयंत ठमके ,रामाजी हस्ते ,दीपक गजभिये ,विजय भसारकर, अशोक देवगडे ,निर्गुण पेटकर, अशोक कासवटे ,राजीव नंदेश्वर, राजीव तांबेकर, राजेंद्र प्रसाद आंबेकर ,पुंडलिक भोयर, रेखाताई तेलतुंबडे ,राखी टिपले, भीमराव बौद्ध ,(सदस्य) सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अति परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कळस्कर यांनी केले तर आभार विजय भसारकर यांनी व्यक्त केले.

0 Comments