मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री प्रीतमदास सोनारकर यांच्या सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
वरोरा (प्रती ) भारत शिक्षण संस्था वरोरा द्वारा संचालित भारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चारगाव (खुर्द)चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री प्रीतमदास सोनारकर यांचा सपत्नीक वयोपरत्वे सेवानिवृत्ती सोहळा 31 मे 2024 ला संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कृष्णकांतजी लोया तर प्रमुख पाहुणेश्री.शाम लोया,श्री. रामबाबू लोया, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. सोनेकर सर, श्री.आबाजी देवाळकर सर श्री.कळसकर सर,श्री. रघुनाथ मिसाळ सर,श्री.शंकरभेले,श्री.प्रदिप भले व श्री.परेलवार सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विचार मंचावर चारगाव खुर्द चे सरपंच श्री. राजूभाऊ चिकटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. राजूभाऊ गोडघाटे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. दिलीप बोधाणे आणि भारत विद्यालय मुलांचे वस्तीगृह चे माजी अधीक्षक श्री.वसंतरावजी पावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अभय धोबे कनिष्ठ लिपिक यांनी केले. प्रस्ताविकामधून सरांकडून मिळालेल्या योगदानाचे त्यांनी अभिनंदन करून शाळेची विदारक स्थिती काय याचा विस्तृत लेखाजोखा प्रास्ताविकातून मांडला. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती यांच्या परिचय करून देताना श्री.अनिल गजभे सर यांनी सरांची एकंदरीत 35 वर्षाची सेवा करीत असताना सरांची कार्याप्रति असलेली कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि कर्मचाऱ्याप्रती असणारी सहकार्याची व प्रेमाची भावना यांचा आवर्जून उल्लेख केला. सरांनी याच भारत विद्यालयातून 13 ऑक्टोबर 1989 ला सेवेचा प्रारंभ केलेला असून त्यांची सेवानिवृत्तीही याच विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून होत आहे हे सरांसाठी कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला. या सेवा काळात सोनारकर सर यांनी परीक्षा विभाग प्रमुख पर्यवेक्षक तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील गणित विषयाचे विषय तज्ञ म्हणून कार्यही केले .याप्रसंगी सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर श्री. दिलीप भाऊ जुनारकर आणि संच यांनी स्वागत गीत आणि सत्कार गीतही सादर केले .त्यानंतर भारत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कृष्णकांतजी लोया, श्री.रामबाबू लोया आणि श्री.श्याम बाबु लोया सदस्य यांचे हस्ते प्राचार्य श्री. प्रीतमदास सोनारकर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी भारत विद्यालय चारगाव खुर्द मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदावर केलेल्या उल्लेखनीय कार्य व सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांचाही शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन भारत शिक्षण संस्था व भारत विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ही प्रेरणा सुद्धा मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री.सोनारकर सर यांच्या कल्पनेतूनच समोर आली.सोबतच भारत विद्यालय मुलांचे वस्तीगृह चे सेवानिवृत्त अधीक्षक वसंतरावजी पावडे यांचाही सत्कार व सन्मान करण्यात आला. सरांनी दिलेल्या सेवेबद्दल कौतुक करणारी मनोगते माजी मुख्याध्यापक श्री .सोनेकर सर,श्री.आबाजी देवारकर सर, श्री. रघुनाथजी मिसाळ सर, श्यामबाबू लोया, रामबाबू लोया यांनी व्यक्त केली श्री.सोनारकर सरांनी यापुढेही आमच्या भारत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा सहयोग करावा अशी सूचनाही अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे सचिव श्री. कृष्णकांजी लोया यांनी केली .
सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रीतमदास सोनारकर यांनी सर्वप्रथम भारत शिक्षण संस्थेचे आभार मानले. जर भारत शिक्षण संस्थेने मला सेवा करण्याची संधी दिली नसती तर आज माझी ही प्रगती झाली नसती अशी प्रतिक्रिया सरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. सतत 35 वर्षाची सेवा करताना विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दिलेली साथ ही अतिशय मोलाची असल्याने त्यांनी स्पष्ट केले. सोबतच ही सेवा प्रभावीपणे पार पाडताना त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उत्तम साथ मिळाली याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मानही केला.सोबतच गावातील सर्व मंडळी ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचेही याप्रसंगी आभार व्यक्त केली. शेवटी जाता जाता आपल्या गोड आवाजात एक सुंदर निरोप गीतही याप्रसंगी सरांनी सादर केले. शेवटी श्री. प्रदीप लिल्हारे सर यांनी आभार प्रदर्शन केले. सर्वांच्या सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम जवळपास चार ते साडेचार तास चालला .या कार्यक्रमाला सर्व अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,सरांचा मित्रपरिवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सेवकराम आनंदे सर यांनी केले.

0 Comments