वरोऱ्यात 'स्वरचित रे' या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन

वरोऱ्यात 'स्वरचित रे'  या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन 


वरोरा (प्रती)
       आजवर ध्वनिमुद्रित न झालेल्या व स्वतंत्रपणे संगीतबद्ध झालेल्या काव्यरचनांचा आगळावेगळ्या स्वरचित रे या कार्यक्रमाचे आयोजन वरोऱ्यात शनिवार दिनांक 13 जुलै ला सायंकाळी 6 वाजता स्थानिक कटारिया मंगल कार्यालयात केलेले आहे.
      निशिगंधा -पाटील -कमलापूरकर आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साऊंड इंजिनियर मंदार कमलापुरकर (मुंबई ) तसेच पराग साठे 
(स्वीडन) यांनी पहिल्यांदा पुणे येथे स्वरचित रे या संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण केले असता त्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात  मंदार कमलापूरकर, पराग साठे, अमोल पाटील आणि इतर नामांकित कवींच्या रचना पराग साठे आणि निशिगंधा -पाटील -कमलापुरकर गाणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मंदार कमलापुरकर आणि मानसी साठे करणार असून याला प्रा श्रीकांत पाटील व पराग साठे यांनी संगीत दिले आहे.
        या कार्यक्रमाला अक्षय शेवडे, सुधीर टेकाळे,  मंदार देव आणि आदित्य आपटे हे नामांकित वादक कलावंत साथ संगत करणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments