ज्येष्ठ सेवाव्रती भाऊराव चिवंडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

ज्येष्ठ सेवाव्रती भाऊराव चिवंडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित 



    वरोरा (प्रती )
सिनेआर्क प्रोडेक्शनस कास्टिंग स्टुडिओ आणि रुद्रांश फाऊंडेशन मुबई चे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक भवन,  पुणे येथे वरोरा येथील जेष्ठ समाजसेवक भाऊराव चिवंडे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उ्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
     या प्रसंगी सिनेआर्क प्रोडेक्शनस आणि रुद्रांश फाऊंडेशन मुबई चे मॅनेजिंग डायरेक्टर व मुख्य अधिकारी विनोद खैरे, पुणे महानगर पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोहोळ, पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त युसुफ पठाण, ज्येष्ठ वक्त्या लेखिका शैलजा मोहोळ, इंक्रेडीबल सोशल ग्रुपचे असलम बागवान , निसार फाऊंडेशनचे   हाफीज शेख उपस्थित होते.
    सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भाऊराव चिवंडे हे समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व झोपडपट्टीतील मुलींसाठी वस्तीगृह चालवितात. सर्व सोयींनी युक्त अशी प्राथमिक शाळा त्यांनी मुलांसाठी सुरू केली असून त्यांनी सर्व शिक्षा अभियानाचे माजी सल्लागार म्हणून कार्य केले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते कोषाध्यक्ष असून या संघटनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांकरिता वेगवेगळे उपक्रम चालविले जातात.
         या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments