सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक
वरोरा- कोरपना पोलिसांची संयुक्त कारवाई
सात लाखाचा मुद्देमाल जप्त
वरोरा (प्रती) पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा येथे दिनांक १७जुलै २०२४ रोजी फिर्यादी शरद सिताराम गुधाने (५३) वर्ष त्यांच्या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक करून सोन्याचे दागिने जप्त केले अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या चहाच्या दुकानातील २६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ६,७२, ५००रूपये ,१,००००० रुपये नगदी, एक मोबाईल अंदाजे ८,०००रुपये असा एकूण ७,८०,५०० रुपयाचा माल चोरट्यांनी चोरून नेला फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम ३०५ भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
तपासा दरम्यान वरोरा येथील डी . बी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या मदतीने तपासाचे चक्र फिरवून गोपनिय माहितीवरून आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीकडून पिसीआर दरम्यान चोरलेले आठ सोन्याची अंगठी ,चार सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याची चपला कंठी, एक जोड सोन्याचे कानातले ,दोन सोन्याची पोत, एक सोन्याचा गोफ एकूण सोन्याचे दागिने मोबाईल व इतर गुन्ह्यात वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्र एम एच ३४ ए ए ३३२४गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा क्र. एम एच ३१ई . व्ही ९१८८ असा एकूण ६,८५,००० रुपयांचा मुद्देमाल आरोपी नामे, प्रदीप शंकर शेरकुरे, आकाश नारायण शेरकुरे, चिंतामण संजय शेरकुरे , हरिना प्रदीप शेरकुरे, माया देवगडे सर्व राहणार पारधी गुडा धोपटाळा ता. कोरपना तसेच विकास काळे रा. चिनोरा पारधीटोला ता. वरोरा यांच्याकडून पिसीआर दरम्यान जप्त करण्यात आला.
वरील कारवाई मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रीना जनबंधू ,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, नयोमी साटम ,सहाय्यक पोलीस अधीक्षक वरोरा ,महेश कोंडावार, पो. नि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, अजिंक्य तांबडे पो . नि वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विनोद जांभळे वरोरा, सपोनी मनोज गदादे चंद्रपूर, विकास गायकवाड पोलीस स्टेशन कोरपना तसेच पोलीस स्टेशन वरोरा येथील डी . बी पथकातील पोलीस हेड .कॉ दीपक दुधे , संदीप मुळे ,विशाल राजूरकर, महेश गावतुरे , मोहन निषाद ,राजू लोधी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कोरपना येथील पोलीस स्टॉफच्या मदतीने केली

0 Comments