वरोरा येथील पूर्वेस वांढरे प्रकरण

वरोरा येथील पूर्वेस वांढरे प्रकरण 

"त्या" घटनेशी माझ्या कंपनीचा कुठलाही संबंध नाही_जावेद रजा 


वरोरा (प्रती)मालवीय वार्डातील डायरियाने मृत्यू झालेल्या बालकाच्या मृत्यूला  विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला जबाबदार धरले जात आहे .नगरपरिषद अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट माझ्याकडे नाही त्यामुळे त्या बालकाच्या मृत्यूस कंपनी जबाबदार नाही असे स्पष्टीकरण विदर्भ मल्टी सर्विसेसचे संचालक जावेद रजा यांनी दि.२१रोज रविवारी एका पत्रकार परिषदेत दिले , मालवीय वार्डातील काही नागरिकांना अतिसाराची लागण झाली होती यामध्ये पूर्वेस सुभाष वांढरे या दहा वर्षे बालकाचा ५ जुलैला मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी तसेच विदर्भ मल्टी सर्विसेस  या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा इत्यादी मागण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांनी १९ जुलै रोजी तहसील कार्यालयातील मनोऱ्यावर चढून आंदोलन केले होते नगरपरिषदचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी या संदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर डहाणे यांनी आंदोलन मागे घेतले याबाबत जावेद रजा म्हणाले वरोरा शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी माझ्या कंपनीकडे आहे मालवीय वार्डातील नादुरुस्त व्हॉल्वची तक्रार सुद्धा संबंधितांनी केली नाही मार्च महिन्यामध्ये माझ्या कंपनीकडे असलेले कंत्राट संपुष्टात आले असून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू आहे सध्या मला या कामाची  मुदत वाढ मिळाली असून शुद्ध पाणी पुरवठा वितरणाशी माझा कुठलाही संबंध नाही.  असा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला

Post a Comment

0 Comments