वरोरा पथ विक्रेत्या समितीची निवडणूक अविरोध
वरोरा(प्रती)शहरी पथविकेत्यांचे नियम तसेच त्यांना उद्योगधंदे चालण्याकरीता पोषक वातावरण उपलब्ध करून देणे याचबरोबर पथविकेत्यांमुळे होणारी गर्दी व आरोग्याची काळजी याचा समन्वय साधणारा पथ विक्रेते ( उपजीविका संरक्षण आणि विक्रीचे विनिमय )अधिनियम 2014 लागू करण्यात आलेला आहे याच अनुषंगाने पथविक्रेता समितीच्या निवडणूक घेण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या कामगार अधिकारी यांच्यामार्फत नगर पालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांना निवडणूक अधिकार म्हणून नियुक्त करण्यात आले व त्यांच्या देखरेखित सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती मधून सुभाष वावरे ,अनुसूचित जमाती मधून संजय आत्राम इतर मागासवर्गीय महिला मनिषा लोणगाडगे ,अल्पसंख्यांक म्हणून अफरोश शेख ,खुल्या प्रवर्गात प्रवर्ग अ मधून रवींद्र लोणारे ,खुल्या प्रवर्ग मधून संजय भाऊ नरोले व महिला राखीव मधून रेवती ताई इंगोले यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक अधिकारी गजानन भोयर यांच्या हस्ते 12 जुलै 2014 ला त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले ,निवडणुकी यशस्वी करण्याकरीता सुरज पुनवटकर सहाय्यक निवडणूक निरीक्षक अधिकारी, झीलपे मॅडम कार्यालय अधीक्षक, गजानन आत्राम संवग अधिकारी, उमेश कथडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी काम पाहिले

0 Comments