श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल-परीक्षित एकरे
वरोरा (प्रती)३० वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्री रंगनाथ स्वामी सहकारी पत संस्थेच्या वेगवेगळ्या शाखा असून १६ वर्षापासून वरोरा येथे कार्यरत आहे पतसंस्थेची वाटचाल यशस्वीरित्या सुरू असून प्रगतीपथावर असल्याचे मत परीक्षित एकरे यांनी पतसंस्थेच्या वर्धापन दिनी व्यक्त केले
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा वरोरा तर्फे दिनांक १४/०८/२०२४ ला१७ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री संत जगन्नाथ बाबा देवस्थान संताजी नगर आझाद वार्ड वरोरा येथे सकाळी १० वाजता पार पडला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक परीक्षित एकरे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दोरखंडे साहेब ऍड. कुत्तरमारे साहेब ,निखाडे गुरुजी हे उपस्थित होते
पुढे परीक्षित एकरे म्हणाले १६ वर्षापासून कार्यरत असलेल्या या शाखेचे छोट्या रोपट्याचे वटवृक्ष झाले तालुक्यातील जनतेने शाखेला भरभरून प्रेम दिले असून ठेवीदाराने आर्थिक गुंतवणूक करताना विश्वासहर्ता तपासूनच गुंतवणूक करावी असे आवाहन याप्रसंगी परीक्षित एकरे यांनी केले सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत व भाषणे पार पडले व नंतर मान्यवर , संस्थेचे दैनिक अभिकर्ता तथा संस्थेचे कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले कार्यक्रमाला संस्थचे कर्मचारी सर्व दैनिक अभिकर्ता यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन पतसंस्थेचे व्यवस्थापक बोबडे साहेब यांनी केले

0 Comments