कर्मवीर विद्यालय वरोरा येथे स्वातंत्र्य दिन साजरा
विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर आधारित गीताचे सादरीकरण
वरोरा (प्रती) कर्मवीर विद्यालय वरोरा येथे दि. १५ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून त्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अंतिम सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी समूह गीत व एकल गीताचे सादरीकरण केले
भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंगडम पासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त झाले होते १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून सर्वत्र भारतात उत्साहात साजरा करण्यात येतो
कर्मवीर विद्यालय वरोरा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र बोरीकर, (मुख्याध्यापक/ अध्यक्ष) प्रमुख अतिथी म्हणून कृष्णाजी खानेकर ,(मुख्याध्यापक कनिष्ठ प्राथमिक विद्यालय वरोरा )गोपाल कुकडे ,(व्यवस्थापक कॅनरा बँक वरोरा) सुमित वानखेडे, (अधिकारी कॅनरा बँक वरोरा) गाटकीने सर ,(सेवानिवृत्त कलाशिक्षक )उमाजी खानेकर, (सेवा निवृत्ती ग्रंथपाल) सुनील शिरसाट ,(पत्रकार )हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन आणि आभार नंदकिशोर मसराम सर यांनी व्यक्त केले

0 Comments