वरोरा (प्रती)
स्पोर्टस फाउंडेशन, वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडाचा व्हॉलीबॉल खेळाडू वैभव प्रमोद साळवे याची कृषी खात्यात कृषी सहाय्यक म्हणून परीक्षा अंतर्गत क्रीडा कोट्यातून नियुक्ती झालेली आहे. वैभव हा व्हॉलीबॉल चा राज्यस्तरावरचा खेळाडू असून त्याने अकोला येथील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले होते. या आधी सुद्धा डब्ल्यूएसएफ व लोक शिक्षण संस्थेचे खेळाडू क्रीडा कोट्यातून नोकरीला लागले हे विशेष.
वैभव याचे लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील सर, उपाध्यक्ष श्रीकृष्णजी घड्याळ पाटील, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोराचे अध्यक्ष श्री गजानन जीवतोडे, लोक शिक्षण संस्थेचे कार्यवाह ॲड. दुष्यंतजी देशपांडे, श्री विश्वनाथ जोशी, यांनी अभिनंदन केले. वैभव यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील सौ मनिषा प्रमोद साळवे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, गणेश मुसळे, दुष्यंत लांडगे यांना दिले.

0 Comments