अल्पवयीन विद्यार्थिनीला रूमवर बोलावून दोन शिक्षकांनी केला विनयभंग

अल्पवयीन विद्यार्थिनीला रूमवर बोलावून दोन शिक्षकांनी केला विनयभंग 
दोघांनाही अटक
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 


वरोरा (प्रती)वाढदिवसाच्या औचित्य साधून शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीला रूमवर बोलावले  तिथे विद्यार्थिनीचा विनयभंग केला ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली याबाबत विद्यार्थिनीच्या  तक्रारीवरून गुरुवारी रात्री वरोरा पोलिसांनी दोन शिक्षकाविरुद्ध विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने रेल्वेतून पळून जाण्याच्या तयारीत असतांना अटक केली वरोरा येथे प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे हे एका नामवंत शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत प्रमोद बेलेकर याचा गुरुवारी वाढदिवस होता त्यामुळे अल्पवयीन मुलगी स्टाफ रूममध्ये प्रमोद बेलेकर याला शुभेच्छा  देण्यासाठी गेली होती. शुभेच्छा दिल्यानंतर प्रमोद बेलेकर याने संध्याकाळी पार्टी देतो असे सांगत मुलींना अभ्यंकर वार्डातील धनंजय पारखे या शिक्षकांच्या रूमवर बोलावले तेथे धनंजय पारखे व प्रमोद बेलेकर यांनी तिचा विनयभंग केला पीडित मुलीने तिथून निघत पालकासह वरोरा पोलिसात तक्रार दिली वरोरा पोलिसांनी प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे यांच्याविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल केला

Post a Comment

0 Comments