विद्यार्थिनीचे विनयभंग प्रकरण
अखेर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल



वरोरा (प्रती)वरोरा येथील एका नामांकित शाळेत दोन शिक्षकांकडून अल्पवयीन अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाली असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती
 व संपूर्ण समाजमन हादरले होते आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून त्या दोन शिक्षकावर ॲट्रॉसिटी ॲक्ट चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान एका निवेदनातून वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या कडे कऱण्यात आली होती. आणि दुपारच्या सुमारास त्या दोन्ही आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट चा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढे निवेदनात म्हटले होते ,प्रमोद बेलेकर याने त्या विद्यार्थिनीला बर्थ डे ची पार्टी देतो म्हणुन रूम वर बोलाविले होते . आणि त्या विद्यार्थिनीचा तिथे विनयभंग कऱण्यात आला. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली होती 

या संदर्भात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे सचिव अमर गोंडाणे यांनी वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांना निवेदन दिले होते.
 आरोपी शिक्षक प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे यांच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, परंतु या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपींविरुद्ध  कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. पीडिता अनुसूचित जातीची असल्यामुळे, या प्रकरणात एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती आरोपी शिक्षक प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहेत का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ही निवेदनातून केली होती  पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी आश्वासन दिले की आरोपींविरुद्ध ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येणार असे आश्वासन दिले होते.

या घटनेमुळे वरोरा शहरातील नागरिकांमध्ये रोष आहे. अशा प्रकारे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंबंधी  प्रश्न उपस्थित झाला असून, भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून कठोर उपाययोजना करण्याची मागणीही सदर निवेदनातून  केली होती. 
निवेदन देताना अमर गोंडाने सह युवक काँग्रेसचे नेता राहुलभाऊ आत्राम, जयभीम सेना अध्यक्ष योगेशभाऊ खोब्रागडे, अभी चौधरी, जितेशभाई चौधरी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.