उपऱ्या अन् नवख्या उमेदवारांना लागले आमदारकीचे डोहाळे



प्रती (वरोरा)वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात उपऱ्या आणि नवख्या उमेदवारांना  आमदारकीचे डोहाळे लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत असून काही उमेदवारांचा  राजकारणाशी कोणत्याही संबंध नसतांना तसेच मतदार संघातील समस्याची कुठ्ल्याही प्रकारची जाण नसतांना केवळ आर्थिक बळावर आमदारकीचे  स्वप्न पाहणाऱ्या मतदार संघाबाहेरील उपऱ्यांना तसेच मतदार संघातील नवख्या उमेदवारांना आमदारकीचे स्वप्न पडत आहेत. मात्र पाच वर्षे चेहरा न दिसलेल्या  उमेदवाराला मतदार स्वीकारेल का? असा प्रश्न या इच्छुक  उमेदवारांच्या पोस्टरबाजी वरून उपस्थित होत आहे. मतदारसंघात विविध समस्या असतांना त्या समस्या निकाली काढण्यासाठी एकदाही प्रयत्न न केलेले चेहरे जनतेच्या गर्दीत दिसत आहेत .वरोरा -भद्रावती विधानसभेत आता हळूहळू रंगत येत असून आता उपरे आणि नवखे उमेदवार सुद्धा फलक लावून रस्त्यावर चमकत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे दोन गट निर्माण झालेले आहेत  ठाकरे गट आणि शिंदे गट  या गटाच्या उमेदवारांनी सुद्धा  आपली दावेदारी ठोकली आहे. महाविकास आघाडीने सेनेला जागा सोडल्यास या विधानसभा क्षेत्रात शिवसैनिक समोरासमोर येणार आहेत  त्यामुळे ही लढत अधिकच चांगलीच  रंगतदार होणार आहे तसेच काही उपरे आणि नवख्या उमेदवारांनी आपली दावेदारी केली आहे . त्यामूळे  जनता यांना पदरात घेणार की  घरचा रस्ता दाखवेल हा चर्चेचा विषय ठरत आहे   निवडणूक तोंडावर असताना शहरात गाववाड्यात, खेडोपाडी ,गल्ली बोळात  शेकडो फलक लावून झळकतांना उपरे दिसून येत आहेत विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीमध्ये  सेनेचे बाळूभाऊ धानोरकर यांनी काँग्रेसचे संजय देवतळे यांना पराभूत केले होते तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले  बाळूभाऊ धानोरकर यांनी भाजपाचे उमेदवार हंसराजभैय्या अहीर यांना पराभूत केले असता पुन्हा विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रतिभाताई धानोरकर यांनी सेनेच्या तिकिटावर उभे असलेले स्व. संजय देवतळे यांना पराभूत करून काँग्रेसच्या तिकिटावर बाजी मारली होती.तुरळक अपवाद वगळता ही विधानसभा स्व. आ. दादासाहेब देवतळे ते स्व. आ. संजय देवतळे यांच्या काळापासुन ते विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पर्यंत भारतीय रा|ष्ट्रिय काँग्रेस पक्षाचा  बालेकिल्ला राहिला आहे हे विशेष...
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील या काँग्रेसच्या गडामध्ये उपरे आणि नवखे उमेदवार कितपत सफल ठरतात हे पाहणे महत्त्वाचे आहे