वरोऱ्यात ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाखाली बनावट वस्तूची विक्री
तीन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांकडून मुद्देमाल जप्त
वरोरा (प्रती)मागील एका दशकापासून लोकसंख्येप्रमाणे वरोराच्या बाजारपेठेतही वाढ झाली असून किराणा व इतर दुकानातून मोठ्या प्रमाणात ठोक आणि चिल्लर विक्री होत असताना दिसते. परंतु ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली काही किराणा दुकानातून बनावट हार्पिक आणि लाईझोल वस्तूची विक्री होत असल्याचे प्रकरण उघडकीस येताच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील अधिकृत कंपनीचे सल्लागार अल्ताफ शेख यांनी दि. २६/०९/२०२४ रोजी वरोरा पोलीस स्टेशन येथे बनावट हार्पिक आणि लायझोलची विक्री होत असल्याची फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त केला.
गेल्या अनेक दिवसापासून आनंद किराणा,वानखडे एजन्सी, तसेच अतुल प्लॅस्टिक कन्फेक्शनरी या दुकानामधून बनावट हार्पिक आणि लायझोलची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांच्या मदतीने संबंधित दुकानावर धाड टाकली यामध्ये,४६ हजार ४४५ रुपयाचा बनावट हार्पिक आणि लायझोल असा मुद्देमाल मिळून आला असता आरोपी महेंद्र धोपटे, कौस्तुभ वानखेडे ,अतुल गोठी यांच्यावर कलम ६३,६५ कॉपीराईट व ३१८ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल केले, सदरची कारवाई उपपोलीस अधिकारी तथा सहाय्य पोलीस अधीक्षक वरोरा, नयोमी साटम मॅडम, वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, तांबडे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहाय्यक निरीक्षक, भस्मे, पोलीस सहाय्यक निरीक्षक ,जांभळे, मोहन निषाद, दीपक दुधे ,मनोज ठाकरे यांनी केली

0 Comments