ती बातमी चुकीची
बातमीत तथ्य नाही
वरोरा (प्रती) कलम ३२४.. मागणी पंधरा हजार रुपये ...सेटलमेंट पाच हजारात
या मथळ्याखाली दि.९/१०/२०२४ रोजी वरोरा टाईम्सच्या पोर्टलवर बातमी प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही बीटमध्ये छोट्या मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीकडून पोलिस पैशाची मागणी करीत असुन यामुळे गोरगरिबांची पिळवणूक होत असल्याची गाव गाड्यात चर्चा होत असतांना दिसत होती टेंमूर्डा -खांबाडा बीट मधील दोन मारहाणीच्या प्रकरणात आरोपीकडून पैशाची मागणी केल्याची चर्चा होत असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती . संदर्भीय चर्चेतून बातमीची अधिक माहिती घेतली असता सदर बातमीत कुठलेही तथ्य आढळले नसून बातमी चुकीची असल्याचे समजले व अनावधनाने बातमी प्रकाशित करण्यात आली .
सदर बातमीमुळे झालेल्या बदनामीबद्दल अथवा मानसिक त्रासाबद्दल वरोरा टाईम्स कडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.

0 Comments