वरोरा(प्रती ) स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा (डब्ल्यूएसएफ) व लोक शिक्षण संस्था वरोडा यांचा राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू लोकेश कवडूजी मिलमिले यांची स्पोर्ट्स कोट्यातून परीक्षा अंतर्गत महाराष्ट्र राज्य अबकारी विभागात कॉन्स्टेबल पदी निवड झालेली आहे, लोकेशन यापूर्वी अनेकदा महाराष्ट्र संघाचे तथा नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असून . त्याने इंजीनियरिंग पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. लोकेश च्या निवडीबद्दल लोक शिक्षण संस्था वरोडा चे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी अभिनंदन केले असून लोकेश यांनीआपल्या यशाचे श्रेय वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा(डब्ल्यू एसएफ) च्या सर्व पदाधिकारी सहकारी तथा लोकशिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच आई-वडील यांना दिलेले आहे वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोकशिक्षण संस्था वरोडा यांच्या व्हॉलीबॉल या खेळामधील मिळणाऱ्या यशाचे वरोरा शहरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

0 Comments