पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणार आणि समाजातील समस्या शासन दरबारी पोहोचवणार- उत्तम वानखडे
अकोला येथे आंबेडकरी व्हाईस फोरम संघटनेची बैठक संपन्न
चंद्रपूर (प्रती )२० सप्टेंबर २०२४ रोजी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम संघटनेची बैठक अकोला येथे अशोक वाटिका हॉलमध्ये संपन्न झाली सदर बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमजी वानखडे हे होते या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातूनच नवे तर इतर राज्यातूनही आंबेडकरी पत्रकारांनी उपस्थिती लावली सदर बैठकीमध्ये संघटनेचे ध्येयधोरण उद्दिष्ट सांगण्यात आले तसेच ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच समाजातील विविध समस्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी काम करेल असे यावेळी संस्थापक अध्यक्षांनी सांगितले समाजातील अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा याही गोष्टीकडे संघटना लक्ष देईल तसेच १४ एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डीजे मुक्त करून त्याच पैशातून धीरे धीरे का होईना बुद्धिस्ट शैक्षणिक संस्था उभारण्यात याव्या असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षीय भाषणात सांगण्यात आले तसेच संघटनेतील सर्व सभासदांना आपल्या आपल्या परिसरात या कार्याची अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आले या कार्यक्रमाला बरेचशा पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संघटनेमध्ये तन-धन धनाने काम करू असे सांगितले तसेच या बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व आयडी कार्ड देण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण पंचशील घेऊन सांगता सरनतेगातेने करण्यात आली व नंतर भोजनदान देण्यात आले
सदर बैठकीला संस्थापक अध्यक्ष उत्तमजी वानखडे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंग महाराष्ट्र प्रदेश सचिव देवचंद्र समदूर तसेच केंद्रीय व राज्यकारणी मधील समस्त पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यसचिव देवचंद्र समदुर यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रीय सल्लागार पंडित परघरमोर यांनी केले

0 Comments