कापसाला मुहूर्तावरच ७२०९ रूपये भाव 

 पारस कॉटन इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदीचा भव्य शुभारंभ






वरोरा (प्रति)शेतातील कापूस वेचणीस सुरुवात झाली असून दि२४/१०/२०२४रोजी पारस कॉटन इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कापसाला ७२०९ रुपये भाव मिळाला.दीपावलीची लगबग बघता ,बळीराजांनी कापूस विक्रीस आणण्यास सुरुवात केली आहे, नेमका हाच धागा पकडत पारस कॉटन इंडस्ट्रीजचे  संचालक अमोल मुथा यांनी गुरुपुष्पामृतचा मुहूर्त साधत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यावेळी अमोल मृ्था यांचे धाकटे बंधू पवन मुथा यांनी विधिवत पूजा-अर्चा करून खरेदीचा शुभारंभ केला यावेळी  जिनिंगचे  संचालक,अमोल मूथा, उषा कुरेकार मॅडम यांनी शाल,श्रीफळ देऊन शेतकऱ्यांचा सत्कार केला याप्रसंगी अमोल मुथा आपली प्रतिक्रिया देत म्हणाले  ,परिसरातील पाच ते सहा जिनिंग मध्ये आज कापूस खरेदीचा शुभारंभ झाला असून त्यांच्या तुलनेत आम्ही आमच्या जिनिंग मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला जास्तीचा भाव देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करित असल्याचे म्हणाले तसेच  शेतकऱ्यांची आर्थिक अडचण बघता त्यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ करून शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा देण्याचं कार्य केले असल्याचे म्हटले, यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितिचे केंद्र प्रमुख जितेंद्र कुकडे,परिसरातील शेतकरी बांधव तसेच,कॉटन इंडस्ट्रीजचे कर्मचारी उपस्थित होते,