शेतकरी, शोषित, पीडित व बेरोजगारांच्या समस्यांना अग्रक्रमाने प्राधान्य देत क्षेत्राचा कायापालट करणार- करण देवतळे
...अखेर करण देवतळे यांना वरोरा- भद्रावती विधानसभेची उमेदवारी जाहीर
जल्लोषात स्वागत
वरोरा ( प्रती )वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर ,शोषित ,पीडित तसेच बेरोजगारांच्या समस्याना अग्रक्रमाने प्राधान्य देत वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राचा कायापालट करणार असल्याचे मत महायुतीचे भाजपा उमेदवार करण देवतळे यांनी व्यक्त केले
गेल्या अनेक दिवसांपासून वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्रातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याविषयी जनतेत, मतदारसंघात तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते,अखेरच्या टप्यात रमेश राजुरकर यांच्या नावाची भक्कम चर्चा झाली, परंतु या सर्व चर्चेला विराम देत,अखेरच्या क्षणी महायुतीचा उमेदवार म्हणुन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संजय देवतळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असता महायुतीने वरोरा-भद्रावती वासियांना सुखद धक्का दिला,याप्रसंगी करण देवतळे यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यात प्रचंड जल्लोष पहावयास मिळत असून कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला, युवकांना सोबत घेत मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट कसा करता येईल,सामान्य जनतेच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहून,त्यांचे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल,तेंव्हा जनतेनी सुध्दा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा माणूस म्हणून मला संधी द्यावी, असे मत त्यांनीं वरोरा टाईम्सशी बोलतांना व्यक्त केले,

0 Comments