स्वररसाधना च्या "दिवाळी सांझ पाडव्या" ने फुलली वरोराकरांची दिवाळी


वरोरा (प्रती)दि.29 ऑक्टो. ला धनतेरस च्या शुभ महुर्तावर
स्थानिक स्वरसाधना कला मंच च्या वतीने "दिवाळी सांझ पाडवा" या सुरेल संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी वरोरावासीयांना मिळाली.
या कार्यक्रमा साठी मुंबई हुन सुप्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे तर नागपुरचे प्रसिद्ध गायक श्री मुकुल पांडे यांना मुख्यत्वे पाचारण करण्यात आले होते तर संगीत संयोजन महेंद्र ढोले आणि संच नागपुर यांचे होते.
    "दिवाळी सांझ पाडवा" च्या निमित्याने सौ.सुचेता पद्मावार, आनंद बेदरकर,धनश्री देशपांडे,मुकुल पांडे,तथा डॉ.सुधीर कुणावार यांच्या सुरेल गायनाच्या स्वराभिषेकाने वरोराकर न्हाउन निघालेत,तर निवेदिका आसावरी देशपांडे( गलांडे ) यांच्या खुमारदार निवेदनाने हि संगीत मेजवानी अविस्मरणीय झाली. ही संकल्पना स्वरसाधना च्या सौ.सुचेता पद्मावार,आणि आनंद बेदरकर यांची होती तर आयोजनाच्या रूपाने संकल्पनेस साकारले पराग पत्तिवार यांनी. कार्यक्रमाअंती आभार प्रदर्शनाने या संगीत मैफीलीची सांगता झाली.