बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी कल्पना तोडे यांची निवड




वरोरा (प्रती)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या
बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी कल्पना तोडे यांची नुकतीच निवड करण्यात आली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समता मूलक राष्ट्र निर्माण निर्मितीसाठी आणि रिपब्लिकन पक्षाला राजकीय व्यापकता मिळवून देण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  दीपकभाऊ निकाळजे यांच्याआदेशाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षा  चंद्रपूर तथा विदर्भ महिला अध्यक्षा प्रियाताई खाडे यांनी बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी कल्पना तोडे यांची नियुक्ती केली आहे 
कल्पना तोडे ह्या गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीशी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाची जुळलेल्या असून त्यांना सामाजिक तसेच राजकीय पक्षाची जाण आहे 
वीस वर्षापासून त्या पक्षाशी निष्ठावंत म्हणून काम करीत आहेत. बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.