खेमजई येथे स्वच्छता पंधरवडा संपन्न



 वरोरा तालुक्यातील खेमजई येथे  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार 
 हमी योजना,एक्सिस बँक फौंडेशन,भारत रुरल लाईवलीहुड फौंडेशन व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विध्यमाने स्वच्छता पंधरवडा संपन्न



 वरोरा (प्रती)वरोरा तालुक्यातील एकूण २५ ग्रामपंचायती मध्ये अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प राबविण्यात येत आहे .त्या अनुषंगाणे  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेमजई व परिसरात स्वच्छता पंधरवडा राबवण्यात आला,असून सर्व शाळेतील मुलांना स्वच्छतेचे महत्व आपल्या जीवनात काय आहे व स्वच्छता आपण नेहमी अवलंब केला पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. स्वच्छता या विषयावर  चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, त्यातच पाण्याचे महत्व व महात्मा गांधी रोजगार हमी योजना  बाबत माहिती देण्यात आली. सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला, खेमजई येथील खो-खो या खेळात विदर्भ स्तरीय खेळणारी कु.पालवी सतीश दाते हिचा सत्कार कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था चा वतीने करण्यात आला, या कार्यक्रम साठी सरपंच  मनीषा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश चौधरी, माधुरी निब्रड ,शाळेचे मुख्यध्यापक रामकृष्ण बलकी, ईश्वर टापरे, संजू जांभुळे, अनिल वाघमारे, कु.चेतना मुन रोशन हजारे सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.गावकरी,प्रकल्पाचे कर्मचारी रोशन मानकर,टीम लीडर,शैलेंद्र वराडे,तालूका समन्वयक प्रबुद्ध डोये,कृषी तज्ञ, साधन व्यक्ति गुरूदास चौधरी, मंगेश तुमसरे, पल्लवी नन्नावरे हजर होते