EVM गैरप्रयोगाचा आरोप: वरोरा-भद्रावतीतील निवडणुकीच्या चौकशीसाठी मुकेश जीवतोडेसह कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा


वरोरा(प्रती )
75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयावर संशय व्यक्त करत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत त्यांनी EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कार्यकर्त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी भाजपचे पूर्वी कोणतेही वर्चस्व नव्हते, त्या ठिकाणी पक्षाचा विजय होणे संशयास्पद आहे. यामुळे EVM मशीनचा गैरप्रयोग झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित निवडणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

तसेच, भविष्यातील सर्व निवडणुका बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्यात, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होईल आणि जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास कायम राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदन देताना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत निष्पक्ष निवडणुकीची हमी देण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदन देताना मुकेश जिवतोडे यांच्यासह भद्रावती नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी,  मनीष जेठाणी,माजी नगरसेवक सुधीर सातपुते,दिनेश यादव,किशोर टिपले,राजू सारंदर, माजी नगरसेविका शोभा पारखी, लक्ष्मी पारखी,सुषमा भोयर,प्रणाली मेश्राम,दिपाली टिपले,बाजार समिती संचालक सुनील मोरे, सुधाकर मिलमिले, विपीन काकडे, संदीप मेश्राम,अमित निब्रड,महेश जिवतोडे, गणेश चिडे,गजू पधरे,जावेद शेख, प्रसाद खडसान, मनीष दोहतरे, मनीष ठक, मंगेश ढेंगळे व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.