आज वरोऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

प्रकाशनाथ पाटणकर यांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम



वरोरा (प्रती)बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोरा द्वारा आयोजित बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलन (कार्तिक पौर्णिमेनिमित्त) दि १५ नोव्हें.२०२४, शुक्रवारला स्थळ- बुद्धभूमी वरोरा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दि.१५ रोजी स.५ :०० वा. ध्यान साधना, स.७: ३०वाजता धम्म ध्वजारोहण, स.९ :०० ते १०: ३० वा त्रिशरण पंचशील व धम्मदेशना, सदर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष पू .भदंत धम्मसारथी ,मुख्य धम्म प्रशिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना नागपुर, यांची उपस्थितीराहणार आहे.विषय- बुद्ध धम्माचे बाह्य अंतरंग स.१०: ३०ते १२: ३०वा. भिक्खु संघ, उपासक उपासिकांना भोजनदान दु.१२:३० ते २: ३०वा "मुद्दे की बात"हा कार्यक्रम आयोजित केला असून मुख्य मार्गदर्शक आयु.आशिष फुलझेले, सचिव- मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर, आयु.राजू खोब्रागडे सदस्य -मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर, विषय -केंद्र व राज्य सरकार द्वारा राबविण्यात येणारी परदेशी शिष्यवृत्ती बाबत सविस्तर माहिती, आयु.जयंत भगत, आरोग्य विभाग, मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर, विषय - वैद्यकीय क्षेत्रातील सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन, हे उपस्थित राहणार,द्वितीय प्रबोधन सत्र वेळ दु.२: ३०ते ६:०० कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक पु.भदंत धम्म सारथी ,विषय- बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीचा चार आठवड्याचा प्रवास व ध्येयप्राप्ती ,मुख्य मार्गदर्शक आयु. भंते राहुल डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना नागपूर आयु. संजय थूल ,असिस्टंट कमिशनर जीएसटी नागपूर ,आयु. अभिषेक सारनाथ, सामाजिक, राजकीय आंबेडकर विचाराचे अभ्यासक यांची उपस्थिती राहणार आहे.सदर कार्यक्रमात ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कार्यकर्ते तथा कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून साय. ६:०० वाजता मुख्य संगीतमय कार्यक्रम आयु. प्रकाशनाथजी पाटणकर महाराष्ट्राचे प्रख्यात गायक, प्रबोधनकार तथा बुद्ध फुले - शाहू - विचारांचा बहारदार या कार्यक्रमाचे आयोजन केले असून समस्त बौद्ध बांधवांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोरा यांनी केले आहे.