प्रजासत्ताक शिक्षक संघाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित
वरोरा(प्रती)
स्थानिक जिवक वाचनालय वरोरा येथे नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
सदर निवडणूक घेते वेळी केंद्रिय अध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी, उपाध्यक्ष मारोती पाटिल सर, कार्यवाहक प्रा. संजय बोधे सर उपस्थित होते. नागपूर विभागाचे अध्यक्ष हेमराज नंदेश्वर यांच्या अनुमतीने चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची निवडणूक पार पडली.
चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी रविंद्र मोटघरे तर कार्याध्यक्ष पदी प्रितम सोनारकर यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदी कोरपना येथिल प्रा. मनोहर बांबोळे व नागभिड येथिल दिवाकर शेंडे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यवाहक पदी अरुण गायकवाड (चिमुर), संघपाल रामटेके (बल्लारपूर), व प्रफुल नगराळे (ब्रम्हपूरी) तर कोषपाल पदी दुर्गेस पाटील (पोंभुर्णा) यांची निवड झाली.
संघटक पदी विविध तालुक्यातील कार्यकर्तांची निवड करण्यात आली, त्यात बुध्देश्वर मानकर (मुल), संतोष निखाडे, (जिवती), पी. यु. मून (राजुरा), विनय खोब्रागडे (सिंदेवाही) हे आहेत. सदस्य म्हणून कारुजी अलोने (गोंडपिपरी), पृथ्वीराज डोंगरे (सावली) तर महिला प्रतिनिधी कृपला पुनवटकर झाल्या. कायदेशीर सल्लागार म्हणून अँड. बी. पी. टिपले (चंद्रपूर) काम करतील.
संघटनेचे प्रसिध्द प्रमुख म्हणून सुहास लुतडे यांची सर्वानुमताने निवड झाली आहे. विविध शाळेतील शिक्षक वर्गाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांच्या समस्या लवकरच शासनाकडे पाठविण्यात येऊन शिक्षणाधिकारी (माध्य) कडे बैठक लावण्यात येईल असे आवाहन करण्यात आले. कुणाच्या काही समस्या असतील तर त्यांनी पदाधिकार्याशी संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे.

0 Comments