बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनाचा कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी

 बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनाचा कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी






 वरोरा (प्रतिनिधी) :

पंचशील बहुउद्देशीय मंडळ, वरोरा यांच्या वतीने कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलन हा कार्यक्रम अतिवृष्टीमुळे आणि मैदानाची झालेली दुरवस्था यामुळे स्थगित करण्यात आला होता.५ नोव्हेंबरचा स्थगित केलेला हा कार्यक्रम आता शनिवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पूर्वनियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार आयोजित करण्यात येणार आहे.


हा सोहळा बुद्धभूमी परिसर, वरोरा येथे होणार असून, या कार्यक्रमात वरोरा तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक-उपासिका तसेच नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


मंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “अतिवृष्टीमुळे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय हा अनिवार्य होता. नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, आता योग्य हवामानात आणि पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडेल.

Post a Comment

0 Comments