.जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत संधिनिकेतन कर्मशाळेचे नेत्रदीपक यश

 जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत संधिनिकेतन कर्मशाळेचे नेत्रदीपक यश


क्रीडा स्पर्धेत २० सुवर्ण व ६ रौप्य पदके पटकावली तर सांस्कृतिक स्पर्धेत हि अव्वल





वरोरा (प्रतिनिधी)जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जि.प. चंद्रपूर तर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्य दिनांक ३ डिसेंबर २०२५ ला जिल्हा क्रीडा स्टेडीयम, चंद्रपूर येथे दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग शाळा व कर्मशाळेने सहभाग नोंदविला होता. महारोगी सेवा समिती वरोरा, संचालित संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन येथील ३० दिव्यांग खेळाडू यात सहभागी झाले. ज्यात अंध, कर्णबधीर व अस्थिव्यंग मुला-मुलींचा समावेश होता. यात कर्मशाळेने २० सुवर्ण व ६ रौप्य अशी तब्बल २६ पदके पटकावली.


सदर क्रीडा स्पर्धेचे उ‌द्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर मा. पुलकित सिंह यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कल्पना शिरसागर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव मा. सुधीर इंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) मा. नूतन सावंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. अतुलकुमार गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मा. मीना साळुंखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. अश्विनी सोनवणे यांचेसह अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. धनंजय साळवे यांनी केले. मा. सुधीर इंगळे यांनी दिव्यांगांचे अधिकार व कायदा यावर विशेष मार्गदर्शन केले. तर मा. पुलकित सिंह यांनी जिल्हा प्रशासन राबवीत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली व दिव्यांगांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. कर्मशाळेच्या वस्तू प्रदर्शनी दालनाला मान्यवरांनी भेट देऊन मुलांचे मुक्तकंठाने कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे संचालन संजय पेचे तर आभार कचरू दुर्गे यांनी मानले.


जल्लोष तर होणारच !.... या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. धनंजय साळवे यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात दिव्यांगांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात दिव्यांग शाळा/कर्मशाळेतील वि‌द्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात कर्मशाळेतील दोनही सामूहिक नृत्याला अनुक्रमे प्रथम व दिव्तीय तर एकल नृत्याला व गायनाला अनुक्रमे प्रथम व दिव्तीय पुरस्कार मिळाले. यात कु. पूजा सौन्दिया

या एका पायाने दिव्यांग असलेल्या मुलीने सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने अनेकांचे डोळे पाणावले. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाला सेवानिवृत्त उपयुक्त व माजी समाज कल्याण अधिकारी मा. राजेश पांडे, उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक मा. आशुतोष सपकाळ, गट विकास अधिकारी, पोम्भूर्णा मा. नमिता बांगर यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मशाळा निदेशक गिरीधर मसराम व मनीषा पडगीलवार यांनी संयुक्तरीत्या केले.


सदर स्पर्धेसाठी कर्मशाळा व्यवस्थापकीय अधीक्षक, निदेशक / निदेशेकेतर कर्मचारी, निजबल शिक्षानिकेतन शिक्षक कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सांस्कृतिक स्पर्धेत सादर झालेले नृत्य कर्मशाळेचे माजी वि‌द्यार्थी व नृत्यप्रशिक्षक विवेक गलांडे यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आले होते. कार्मशाळे तर्फे क्रीडा स्पर्धेत कु. वैष्णवी मेश्राम, गायत्री मते, तेजस्विनी कुळमेथे, अनुष्का वाकडे, आकांक्षा शेंडे, शिल्पा लोडल्लीवार जान्हवी पावडे, अश्विनी मेश्राम, दिपाली बदकी, वेदांती नन्नावरे, पूजा सॉदिया, सविता मेश्राम, आकाश गोटा, मयूर जंगठे, आश्रय मोहुर्ले, साहिल धानफोले, अनिल दुर्वा, प्रेमकुमार बाकडा, द‌द्यानचंद नंदेश्वर, लक्षण निकोडे, अभय भोयर, कुणाल सोयाम, भूषण मेडीलवार, मयूर पोटे इत्यादी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे मसेस सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, सुधाकर कडू, माधव कवीश्वर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेछ्‌या दिल्या.

Post a Comment

0 Comments