जनतेचा आवाज ; समाजसेवेचा झंझावात__ माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली*

 *जनतेचा आवाज ; समाजसेवेचा झंझावात__ माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली*




वरोरा (प्रती)समाजकारण आणि राजकारण ही दोन प्रवाह वेगवेगळ्या दिशांनी वाहताना दिसतात; परंतु जेव्हा हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात, तेव्हा समाजजीवनात अमूल्य परिवर्तन घडते. वरोऱ्याच्या च्या भूमीत जन्म घेऊन समाजसेवेच्या ओढीने आणि लोकहिताच्या ध्यासाने आयुष्य वेचणारे नाव म्हणजे अहेतेशाम सदाकत अली. धर्म, जाती, भाषा यांच्या सीमा ओलांडून त्यांनी सर्वधर्मसमभावाचा दीप प्रज्वलित केला. समाजातील वंचित, गरीब, विधवा, विद्यार्थी, शेतकरी, खेळाडू अशा प्रत्येक घटकाच्या दुःखात सहभागी होत लोकहिताला राजकारणाइतकेच महत्व देणारे हे व्यक्तिमत्व जिल्ह्यातील लोकाभिमान बनले आहे.







वरोऱ्याच्या भूमीत जन्मलेल्या अहेतेशाम सदाकत अली यांनी आपल्या कार्यातून हाच आदर्श घालून दिला आहे.


24 मे आज त्यांचा वाढदिवस  वरोऱ्यात जन्मलेले अहेतेशाम अली, वडिलांचा व्यवसाय हार्डवेअरचा असला तरी त्यांनी प्रॉपर्टी व्यवसायातही यश मिळवले. शिक्षणाची वाटचाल आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथे पदवीपर्यंत झाली. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व असलेल्या या व्यक्तिमत्वाचा धर्म इस्लाम असून सुद्धा समाजात सर्वसमावेशकतेचा संदेश दिला आहे.


तरुण वयातच राजकारणाची आवड निर्माण झालेल्या अहेतेशाम अली यांचा राजकीय प्रवास एका संस्मरणीय क्षणातून सुरु झाला. यंग इंडियन सोशल फोरमच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिलेलं त्यांचं पहिलं भाषण आणि शिक्षकांचा केलेला सत्कार हीच त्यांची राजकीय चळवळीची पहाट ठरली. या प्रवासातील पहिल्या भाषणाचा दुर्मिळ फोटो आजही त्यांनी जपून ठेवला आहे.


होता.


2016 साली नगरपरिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पद काबीज करुन त्यांनी आपली ओळख सिद्ध केली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा-भद्रावती मतदारसंघातून उमेदवारी लढवत तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान त्यांनी पटकावला.


*समाजकारणातील भरीव योगदान*




अहेतेशाम अली यांनी केवळ राजकारणात नव्हे तर समाजकारणातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.


*विधवा महिलांना आर्थिक मदत व रोजगार उपलब्ध करून देणे*


*गरजू व दुर्लक्षित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत देणे*


*सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या वाटा दाखवणे*


 *गरीब व अनाथ मुलींचे सामूहिक विवाह समारंभ आयोजित करणे*


*रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, अपंगांसाठी कॅलिपर व अन्य साहित्य वाटप*



*सर्वधर्मसमभावाने मंदिरे, धार्मिक संस्था व कार्यक्रमांना आर्थिक मदत*


या त्यांच्या कार्यामुळे समाजातील सर्व घटकांना आधार मिळाला. "जेव्हा जेव्हा गरजू कुटुंब त्यांच्यादारी आलं, तेव्हा ते मदतीला उभे राहिले" ही त्यांची लोकाभिमुख ओळख झाली.


*संस्थात्मक कार्य व नेतृत्व*


*अध्यक्ष-शहीद चंद्रशेखर आझाद जिमखाना आणि क्रीडा संघटना, वरोरा*


*अध्यक्ष-शांती बहुउद्देशीय सोसायटी, वरोरा*


*उपाध्यक्ष- आझाद हिंद कबड्डी असोसिएशन, वरोरा*


*सदस्य- रोटरी क्लब, संजीवनी महिला मंडळ, हम फाउंडेशन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दुर्गा माता मंदिर*


राजकीय प्रवासात त्यांनी विविध पदे भूषवली


*माजी उपाध्यक्ष- भाजप अल्पसंख्यांक मोर्चा, जिल्हा संयोजक*


*माजी लोकसभा जिल्हा संयोजक- भारतीय जनता पार्टी*


*माजी जिल्हा सचिव - भाजप चंद्रपूर*


*माजी अध्यक्ष- काँग्रेस कमिटी वरोरा ही पदे त्यांनी भूषवली*


*उपाध्यक्ष _ जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर*


आजच्या राजकीय पटलावर स्वार्थापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेते विरळच दिसतात अहेतेशाम अली हे त्यातीलच एक उल्लेखनीय नाव....... धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व धर्मांचा सन्मान करणारी त्यांची विचारधारा, सतत समाजासाठी उभी असलेली त्यांची कर्तव्यनिष्ठा, आणि जनतेचा विश्वास जपणारे त्यांचे कार्य यामुळे ते जिल्ह्यातील एकमेव "सर्वधर्मसमभावी, अभ्यासू आणि जनतेचे खरे प्रतिनिधी" म्हणून परिचित झाले आहेत.


आजच्या स्वार्थी राजकारणाच्या गर्दीतही समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारा नेता शोधायचा झाला, तर अहेतेशाम अली हे पहिले नाव उच्चारले जाईल. धर्मांपलीकडचा विचार, समाजातील प्रत्येक घटकासाठी खुलं हृदय आणि लोकसेवेसाठी अखंड झटणारा ध्यास या गुणांच्या जोरावर त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रवासात समाजकारण आणि राजकारण या दोनही अंगांचा सुंदर मिलाफ आहे. म्हणूनच ते केवळ वरोऱ्याचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे प्रेरणास्थान ठरले आहेत.


*या झंझावाताचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना  खूप खूप शुभेच्छा!*

      


*सुनिल शिरसाट*

 *मुख्य संपादक*

*वरोरा टाईम्स वरोरा*

Post a Comment

0 Comments